Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत गुंड बल्या केरीपाळेकडून तरुणावर हल्ला

15-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

दोघा मित्रात चेष्टा मस्करी सुरु असताना पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक उर्फ बल्लू केरिपाळे आणि त्याच्या साथीदारांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून व डोक्यात बीयरची बाटली मारून जखमी केल्याची फिर्याद रमजान दिलावर तांबोळी (वय ३०, रा. शिंदे गल्ली, म्हसोबा मंदिराजवळ, पद्माळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

‘पद्माळे फाट्यावरील हॉटेल वैभव बिअरबार व परमिटरूमसमोर फिर्यादी रमजान तांबोळी व त्याचा मित्र विकास मदने यांची चेष्टा मस्करी सुरु असताना बल्लू केरिपाळे याने तांबोळी यास तू पोरं बोलावून घेतोस काय? असे म्हणून तांबोळीला पकडून अश्‍लिल शिवी दिली. त्यावेळी कीर्तिराज बर्गे याने त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले. तसेच केरिपाळे व बर्गे यांच्यासोबत असलेल्या तिघांनी तांबोळीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचे मित्र अवधूत नागे, विकास मदने, अजित मदने यांनी भांडणे सोडविली. त्यानंतर सर्वजण त्यांच्या पांढर्‍या रंगाच्या चारचाकीत बसले. बल्लू केरिपाळे हा गाडी चालविण्यास बसला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter