Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कुपवाडमध्ये दोन ठिकाणी घरफोडी : लाखाचे दागिने लंपास

15-May-2019 : कुपवाड / वार्ताहर

शहरातील हणमंत तुकाराम सरगर (वय ३२, रा.खारे मळा) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलुप काढून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कमेसह ७१ हजारांच्या सोने -चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले.

तसेच दुसर्‍या घटनेत विश्‍वनाथ सदाशिव पुणेकर (वय ३३, रा. उल्हासनगर, कुपवाड) यांच्या घरातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. चोरीच्या या दोन्ही घटनांची कुपवाड पोलिसात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की हणमंत सरगर हे खारे मळ्यात राहतात. सोमवारी (दि.१३) कुटुंबासह यात्रेनिमित्त सिध्देवाडी(ता. मिरज) येथे गेले होते, तर हणमंत सरगर हे मित्रासमवेत परगावी गेले होते.चोरट्यांनी घरात कोणी नस ल्याचे पाहून सोमवार ते बुधवार सकाळी या कालावधीत बंद घराच्या दरवाजाचे कुलुप काढून घरात प्रवेश केला.

घरातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र, कानातील टॉप्स, अंगठी, चेन, चांदीचे पैंजण, रोख २ हजार २०० रुपयांसह ७१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सरगर बुधवारी दुपारी घरी आले असता घराच्या दरवाजा अर्धवट अवस्थेत उघडे असल्याचा दिसला .त्यांनी घरात जाऊन बघितले असता बेडरूममधील साहित्य विस्कटून टाकलेले दिसले.तिजोरीत बघितले तर सोन्याचे दागिने नव्हते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter