Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील १,१३६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

15-May-2019 : सांगली /प्रतिनिधी

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ १८८ टँकरद्वारे १८१ गावांतील १ हजार १३६ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात सध्या १८२ खासगी व ६ शासकीय अशा एकूण १८८ टँकरद्वारे १८१ गावांतील १ हजार १३६ वाड्यांमधील ३ लाख, ७६ हजार, ९६५ बाधित लोकसंख्येला व ५१ हजार १३५ पशुधन संख्येला पाणी पुरवठा करण्यात येत आहे, तसेच जिल्ह्यात एकूण ९६ खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले, जत तालुक्यात १२३ गावांपैकी ९२ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील ६७१ वाड्यांमधील २ लाख २३ हजार १३१ बाधित लोकसंख्येला सर्वाधिक १०९ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यात २४ खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत , तर ३ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात ६० गावांपैकी २० गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील ९८ वाड्यांमधील २९ हजार ५५० बाधित लोकसंख्येला १४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात १३ खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, तासगाव तालुक्यात ६९ गावांपैकी २२ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावातील १२७ वाड्यांमधील ३३ हजार १९८ बाधित लोकसंख्येला १३ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तासगाव तालुक्यात १४ खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत. मिरज तालुक्यात ७२ गावांपैकी ८ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील २४ वाड्यांमधील १८ हजार ४६५ बाधित लोकसंख्येला ४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. मिरज तालुक्यात ३ खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित केल्या आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter