Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सभापती निवडी बिनविरोध : भाजपला तीन तर कॉंग्रेसला एक सभापतीपद

21-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या महापालिका क्षेत्रातील स्थानिक पदाधि कार्‍यांनी मात्र भाजपपुढे नांगी टाकल्याचे चित्र आहे. महापालिकेत प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपच्या तिन्ही सभापतींना बिनविरोध केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. प्रभाग समिती एक, दोन व चारच्या सभापतीपदी भाजपचे तर प्रभाग समिती तीनच्या सभापतीपदी कॉंग्रेसचा उमेद वार बिनविरोध झाला.

महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या सभापती निवडी मंगळवारी पार पडल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारचा दिवस होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter