21-May-2019 : विटा / प्रतिनिधी
विटा - भिवघाट एसटीत चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेचे ८१ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजून ३० मि. दरम्यान घडली. याबाबत विटा पोलिसात सुनिता अडसूळ यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता अडसूळ या कराडहून भिवघाटकडे निघाल्या होत्या. विटा बस स्थानकावर त्या गाडीत चढल्या. गाडीत बसल्यावर त्यांना त्यांची पर्स दिसली नाही. त्यांनी पिशवी तपासली, पण ती सापडली नाही. त्यांनी तात्काळ हा प्रकार कंडक्टरला सांगितला.
|