Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वाटेगावात बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

21-May-2019 : कासेगाव / वार्ताहर

वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे शिंगार ओढा येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या वस्तीवरील गोठ्यातील एक वर्षाच्या रेडकूवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारून फस्त केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाटेगाव येथील शिवाजी साळुंखे यांची वस्ती वाटेगाव-टाकवे रस्त्याकडेला गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्याच ठिकाणी साळुंखे राहतात.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter