Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
यशवंतनगरमध्ये ७२ हजारांची घरफोडी

21-May-2019 : कुपवाड / प्रतिनिधी

शहरातील श्रीकृष्ण राजाराम जाधव (वय ५६, रा.यशवंतनगर प्लॉट नं.५६) यांच्या बंद असलेल्या ‘ सुप्रभात ’ बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशानेतरी तोडून बंगल्यातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, मंगळसुत्र, अंगठी, व रोख २० हजार अशी एकूण ७२ हजार २०० रुपयांची चोरी केल्याची तक्रार सोमवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीकृष्ण जाधव हे यशवंतनगरमध्ये कुटुंबासह राहतात. शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाधव कुटुंबिय परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलुप कशाने तरी तोडून दाराजवळ फेकून देऊन बंगल्यात प्रवेश केला.

चोरट्यांनी बंगल्यातील बेडरूम मधील साहित्य विस्कटून टाकले होते. तिजोरीत ठेवलेले सोन्याचे २० हजारांचे मंगळसुत्र, ७ हजारांची अंगठी,२० हजारांचा राणीहार तसेच दुसर्‍या मजल्यावरील बेडरूममधील तिजोरीत ठेवलेले रोख २० हजार रुपये असा एकूण ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter