Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ड्रेनेज ठेकेदाराला बेकायदेशीर सव्वा कोटीची बिले अदा : उत्तम साखळकर

30-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली व मिरजेच्या ड्रेनेज योजनेच्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. शिवाय ठेकेदाराने काम देखील बंद ठेवले आहे , तरी देखील प्रशासनाने ठेकेदारावर मेहरबानी दाखवून आचारसंहितेच्या काळात सुमारे १ कोटी २५ लाखांची बिले अदा केली असल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला , तर आणखी १ कोटींची बिले देण्याचा घाट प्रशासनाचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसेच या कामाचे स्वतंत्र ऑडीट करावे, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नगरोत्थान योजनेंतर्गत सांगली व मिरजेसाठी ड्रेनेज योजनेची ५५ ते ६० टक्के जादा दराची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार २०१३-२०१४ मध्ये ठेकेदारास वर्क ऑर्डरही देणेत आलेली होती. जसजशी कामे होत गेली, तशी त्याची रनिंग बिलेही अदा करणेत आलेली होती , परंतु शासनास उपयोगिता प्रमाणपत्र देतेवेळी शासनाच्या नियमानुसार ५० लाखांवरील कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे बंधनकारक असते , मात्र या कामाचे थर्ड पार्टी ऑडिटच झालेले नव्हते. त्यासाठी मनपाने सल्लागार एजन्सी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांचेकडून थर्ड पार्टी ऑडिट करुन घेण्याचा प्रशासनाने घाट घातला. त्याप्रमाणे दोन्ही शहरांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी जीवन प्राधिकरणने सुमारे २२ लाख रक्कम अगोदर जमा करण्याची अट घातली. त्यानुसार स्थायी समितीकडे हा विषय पाठविण्यात आला. अखेर त्यावर चर्चा होऊन सुमारे १९ लाख इतकी रक्कम थर्ड पार्टी ऑडिटसाठी मान्य करण्यात आली.

त्यानुसार जीवन प्राधिकरण विभागाने सात दिवसांत थर्ड पार्टी अहवाल सादर केला. त्यांनी एवढ्या काळात काय ऑडिट केले कोणास ठाऊक ? विशेष म्हणजे काम पूर्ण होईपर्यंत थर्ड पार्टी ऑडिट होणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्ष जागेवर जावून केले का ? हा ही संशोधनाचा विषय आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter