Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विशाल पाटील यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’

30-May-2019 : सांगली / प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविणार्‍या विशाल पाटील यांची अवस्था ‘ना घर का , ना घाट का’ अशी सध्या झाली आहे. उमेदवारी घेण्यापूर्वी त्यांना तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसचा राजीनामा द्यावा लागला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारावे लागले होते. आता कॉंग्रेसमध्ये सक्रीय होताना याबाबत पेच निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रथम विशाल पाटील हे इच्छूक नव्हते , त्यांनी आ. विश्‍वजीत कदम यांचे नाव पुढे केले होते , मात्र आ. विश्‍वजीत कदम यांनी जाहीर आव्हान दिल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढ विण्याची तयारी दाखविली. त्यानंतरही कॉंग्रेसच्या तिकीटावर लढण्याचा त्यांचा आग्रह होता. स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढविताना अडचणी येतील, पण कॉंग्रेसच्या चिन्हामुळे पारंपरिक व्होट बँक कायम राहील, असे त्यांचे म्हणणे होते. पण राज्याच्या पातळीवर सांगलीची जागा स्वाभिमानीकडे गेल्यामुळे त्यांना स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागली. यासाठी त्यांना स्वाभिमानी संघटनेचे प्राथमिक सदस्यत्व स्विकारावे लागले , पण तसे करताना कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. आता ते कॉंग्रेसमधून सक्रीय होण्याचा प्रयत्न करत असताना स्वाभिमानीचे काय होणार? हा प्रश्‍न आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter