30-May-2019 : इस्लामपूर /प्रतिनिधी
आम्ही सी.आय.डी.अधिकारी आहोत असे भासवून रूमालात बांधायला लावलेले २७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोघांनी हातचलाखीने लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , बाळू काळे यांनी इंडीगो गाडी, वाघवाडी रस्त्याला असणार्या फारूख मिस्त्री यांच्या गॅरेजमध्ये कामासाठी सोडली आहे. गुरूवार दि.३० मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास गाडी आणण्यासाठी घरातून पायी चालत ते गॅरेजकडे निघाले होते. ते शासकीय इमारतीकडे जाणार्या रस्त्यावर आले असता पाठीमागून एक मोटरसायकल त्यांना पास करून पुढे गेली. मोटरसायकलवरील इसमाने काळे यांना आम्ही सीआयडी ऑफीसर आहोत. आमचे चेकिंग सुरू आहे. तुम्ही तुमच्याजवळ असलेले पैसे व सोन्याचे दागिने तुमच्याजवळ असणार्या हात रूमालामध्ये ठेवा. अन्यथा तुम्हाला पोलिस ठाण्यात घेऊन जाईन असे बजावले.
|