Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
येळावीत चोरी : ११ तोळे सोने लंपास

30-May-2019 : तासगाव/ प्रतिनिधी

येळावी (ता. तासगाव) येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन-तीन घरांत घरफोडी केली. अशोक आत्माराम मारवाडी यांच्या घरातील अंदाजे ११ तोळ्यांचे सोने, चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे , तसेच इतरही दोन, तीन घरांत चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत रात्री उशिरा तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत अधिक माहिती अशी की , येळावी येथील कुंभार गल्लीत अशोक मारवाडी यांचे घर आहे. बुधवारी त्यांचे घर बंद होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मारवाडी यांच्या घराचे कुलूप फोडून चोरी केली. तिजोरीसह अन्य महत्वाच्या साहि त्याची नासधूस करून सुमारे अकरा तोळ्यांचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter