Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन : चौघांना अटक

30-May-2019 : जत / प्रतिनिधी

जत येथील पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर जत पोलिसांनी अचानक कोबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांना अटक केली. यावेळी आठ दुचाकी व चारचाकी वाहन जप्त केले.

पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये व सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशनदरम्यान पोलीसांनी जत शहरातील गुन्हेगार राहत असलेल्या वस्त्यांवर स्टाफसह कोंबिंग ऑपरेशन राबविले. त्यामध्ये पोलीसांना हवे असलेले व दाखल गुन्ह्यात पाहीजे असलेले चार आरोपी मिळून आले त्यांना पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter