Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ना.चंद्रकांतदादा निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार

09-Jun-2019 : कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच कोल्हापूर व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे दिल्ली येथे असून सोमवार दि.१० जून रोजी कोल्हापूर येथे येण्यास त्यांना विलंब होणार असल्याने दिनांक १० जून रोजी दुपारी १२ ते सायं.६ या वेळेत ते निवासस्थानी शुभेच्छा स्विकारणार आहेत.

तसेच सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील पोलीस ग्राउंड येथे ट्रॅफिक पोलीस ग्राउंडचे उद्घाटन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणीही ना. चंद्रकांतदादा पाटील रात्री ९ पर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणार आहेत. तरी शुभेच्छा म्हणून हार, बुके, मिठाई न घेता दुष्काळी तालुक्यातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून संवेदना सोशल फौंडेशन या नावे चेक अथवा रोख स्वरुपात मदत करण्याचे आवाहन संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter