Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
तासगाव तालुक्याला अवकाळीने झोडपले

09-Jun-2019 : तासगाव / प्रतिनिधी

पाणी टंचाईच्या झळा सोसत चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणार्‍या तासगाव तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला. अवकाळी पावसाने तासगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. रविवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेताचे बांध भरून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. या पाण्याने द्राक्षबागायतदार शेतकरी सुखावला आहे.

भर उन्हाळ्यात तासगाव तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पावसाने तालुक्यात द्राक्ष बागांच्या खरड छाटन्या झालेल्या काड्या कशा तयार होणार याची चिंता बागायतदारांना लागली होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter