Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महायुतीचे २५० आमदार निवडून येतील

09-Jun-2019 : -ना.सदाभाऊ खोत

शिराळा / प्रतिनिधी

सांगली व हातकणंगले मतदारसंघातील दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. चांगल्या कामाचे चांगले फलीत नक्कीच मिळते. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे २५० आमदार निवडून येतील, त्यामध्ये शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असेल, आता पावसाचे व विधानसभेचे वारे वाहू लागले आहे, लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत ही मोठी क्रांती घडवू असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केले.

ते शिराळा येथे भाजपा व शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने व संजयकाका पाटील तसेच विधानपरिषदेवर निवड झालेबद्दल पृथ्वीराज देशमुख यांच्या जाहीर सत्कार समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी आ. शिवाजीराव नाईक होते.

कार्यक्रमास आमदार सुरेश खाडे, आमदार अनिलभाऊ बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपा समन्वयक मकरंद देशपांडे, माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख, विश्वास सह.साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, माजी सभापती भगतसिंह नाईक, माजी सभापती उदयसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील तसेच वाळव्याचे भाजपा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कृषी राज्यमंत्री खोत पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सांगली व हातकणंगले मतदार संघाकडे लागले होते , परंतु या दोन्ही मतदारसंघातील नेतेमंडळी जनतेला सोबत घेऊन विकास कामे करत आहेत. त्याचप्रमाणे सर्वांनीच एकजुटीने काम केल्यामुळेच हे विक्रमी यश मिळाले आहे, तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार कायमच प्रयत्नशील असल्याचे लोकांना हि समजल्याने जनता काय क्रांती घडवून आणली आहे. ते या लोकसभा निवडणुकीत पहावयास मिळाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter