Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
चोरट्याच्या घरातून चार लाखांची चांदी जप्त

09-Jun-2019 : जत / प्रतिनिधी

चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह २८ किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी (ता.जत) येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा (ता.जत) घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची १० किलोची चांदी ताब्यात घेतली, मात्र आरोपी मिळाला नाही.

लवंगा येथील महादेव सोमलिंग सरगर हा सेमबीयां (चेन्नई) येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह या दुकानातून २८ किलो चांदी घेऊन पोबारा केला होता. चेन्नई पोलीस त्याचा शोध घेत येथे आले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter