Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजवाडी येथे अपघात : वृध्द ठार

09-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

मिरजवाडी येथे दुचाकीला समोरून चारचाकीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवर असलेले शिवाजी बाळासो मोहिते (वय ६०, रा.बुरूड गल्ली, इस्लामपूर) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

शिवाजी मोहिते हे सविता मोहिते (वय ४५,रा. बुरूड गल्ली, इस्लामपूर) आणि विशाल मोहिते (वय ८ रा.बुरूड गल्ली, इस्लामपूर) असे तिघेजण दुचाकीवरून जात होते. ते मिरजवाडी येथे आले असता समोरून येणार्‍या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

जिल्हा परिषदेचे आरोग्या धिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी हे काही कामानिमित्त तेथून चालले होते. अपघात झाल्याचे पाहताच डॉ.गोसावी यांनी त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणले.जखमी विशाल आणि सविता यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter