Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
संजयनगर खूनप्रकरणी दोघे गजाआड

09-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

संजयनगर मधील भाजपचे कार्यकर्ते व बांधकाम साहित्य विक्रेते सुभाष शिवाजी बुवा (वय ५०,रा.निरंकारी कॉलनी, संजयनगर) यांच्या खूनप्रकरणी गुंडाविरोधी पथकाने दोघा संशयितांना रविवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. इम्रान बंडूलाल शेख व रफिक बबलू शेख अशी त्यांची नावे आहेत. बुवा यांच्यावर पूर्ववैमनस्यातूनच तब्बल २४ वार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. इम्रान व रफिक यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खूनप्रकरणात अजून तिघांची नावे निष्पन्न झाली असून ते फरारी झाले आहेत. सुभाष बुवा यांचा मुलगा प्रितम याने फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘शनिवारी रात्री संजयनगरमधील सूर्यनगर कॉलनीत रफिक शेख याने बुवा याना काम आहे असे सांगून तेथे बोलावून घेतले. बुवा तेथे आल्यावर काहींनी अंधाराचा फायदा उचलत बुवा यांच्यावर कुर्‍हाड व कोयत्याने जोरदार हल्ला चढवत त्यांच्या छातीवर, चेहर्‍यावर आणि मानेवर सपासप तब्बल २४ वार केले. यावेळी आमीर मोहिद्दीन अलमेल, बबलू मोहिद्दीन अलमेल आणि सद्दाम मोहिद्दीन अलमेल (तिघे रा.निरंकार कॉलनी) हे देखील घटनास्थळी हजर होते. हे तिघेही फरारी आहेत. उर्वरित दोघांना गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. बुवा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून पसार झाले. याची माहिती मिळताच बुवा यांचे कुटुंबीय आणि तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter