Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
नागजजवळ पुलावरून ट्रक ओढ्यात कोसळला

19-Jun-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळील पुलावरुन ट्रक कठडा तोडून ओढ्यात जाऊन पडला. त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलीआहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज गावालगत हा अपघात झाला आहे. विजापूर ते गुहागर व रत्नागिरी ते नागपूर हा रस्ता एकत्र येतो.या चौकाजवळच ओढा पात्र आहे. ओढापात्राच्या पुलावर अरुंद व अपुरा असा अरूंद पूल आहे. पुल धोकादायक झाला आहे. त्याच्या बाजुचे कठडे तुटले आहेत. त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही बांधकाम विभागाचे अधिकारी या धोकादायक जागेकडे लक्ष देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ट्रक मिरजेहून पंढरपूरकडे निघाला होता. एका मोटरसायकलने कट मारल्याने ही दुर्घटना घडली .

यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रकचालकाने ट्रक ओढ्यात जात असल्याचे लक्षात येताच त्याने ट्रकमधून उडी मारून स्वतःला वाचविले आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. या अपघाताचा कवठेमहांकाळ पोलिस स्टेशन अधिक तपास करीत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter