Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कोयत्याने वार करुन आईचा खून करणार्‍यास जन्मठेप

19-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

आईने शिवीगाळ केल्याच्या कारणावरून कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी नराधम मुलगा आरोपी वसंत चंदर वाघमारे (वय ४०, रा. काळेखडी, आटपाडी, मूळ रा.होनाड, ता. खालापूर जि.रायगड) याला जन्मठेप व १ हजार रु.दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या कामी सरकार पक्षातार्फे अति.सरकारी वकील आरती साटविलकर-देशपांडे यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की , ‘सदरची घटना ४ मार्च २०१८ रोजी सकाळी १०.३० वा. काळेखाडी आटपाडी येथे घडली होती. यातील फिर्यादी राजेंद्र रामराव चव्हाण (रा. घाटदेवुळगाव, ता.आष्टी, जि. बीड) हे ७ वर्षांपूर्वी आटपाडी तालुक्यातील कोठुळी येथे भाड्याने राहत आहेत. ओढ्याच्या काठावरील चिल्लारीची झाडे तोडून त्या पासून कोळसा तयार करून तो उरण येथे विक्रीसाठी पाठवत होते .आरोपी वसंत हा हे काम अंगावर घेऊन करत होता. वसंतला दारूचे व्यसन आहे. त्याला राजेंद्र यांनीच मजुरीसाठी आणले होते. घटनेच्या दिवशी फिर्यादी हे सासर्‍यासोबत काळेखडी येथे बंधार्‍यात कोळसा तयार करण्याच्या कामा वर पाहणी करण्यास जाणार होते. तत्पूर्वी ते कामगारांच्या झोपडीवर गेले असता आरोपी हा दारूच्या नशेत झोपलेला दिसला. त्याच्यासोबत त्याची आई बाजूलाच जखमी अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter