Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डफळापूर-जत मार्गावर अपघात : तरूण ठार

19-Jun-2019 : जत / प्रतिनिधी

डफळापूर-जत रोडवर आर.के. ढाब्यानजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात प्लबिंग कामगाराचा मुत्यू झाला. संजय आजीनाथ शिवडे (वय ३०,रा.मोडनिंब जि.सोलापूर) असे मयत कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी दुपारी घडली.

सांगली येथील ओझा कंपनीत सोलापूर जिल्हातील काही कामगार प्लबिंगचे काम करत आहेत. सध्या त्यांचे कवठेेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथे काम सुरू आहे. या कामगारांपैकी संजय शिवडे हा दुचाकीवरून (क्र. एमएच १०, बिटी-५३९७) जतकडे निघाला होता. खलाटी जवळच्या आर.के. ढाब्याजवळच्या वळणावर त्याचा दुचाकीवरचा ताबा सुटून गाडी बाजूच्या दगडावर आदळली. त्यात संजयला डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मुत्यू झाला. याप्रकरणी चॉंद बाबू मुलाणी यांनी जत पोलीसात वर्दी दिली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter