Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा खोल्यांसह दुरुस्तीला १३ कोटी

25-Jun-2019 : जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा खोल्यांसह दुरुस्तीला १३ कोटी

सांगली / प्रतिनिधी

चालू वर्षात जिल्हा परिषद शाळा बांधकाम व दुरूस्तीची १२ कोटी ७३ लाखांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १३९ नवीन शाळा खोल्या व १०० शाळा खोल्यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच शाळा बांधकाम व दुरूस्तीसाठी इतका मोठा निधी आला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षण समिती सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केल्याने यश मिळाले.

जिल्ह्यात ४६७ शाळा खोल्या धोकादायक आहेत , शिवाय काही शाळांचे निर्लेखन करण्यात आले असून अद्याप बांधकाम केलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची मोठी पंचायत होत आहे. शाळा खोल्या दुरूस्तीची अनेक ठिकाणी गरज आहे, मात्र निधीअभावी ही कामे रखडली आहेत. मागील काही वर्षांत या कामासाठी अत्यल्प निधी आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडुनही शाळा खोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी कमी निधी दिला जात होता. सभापती रवी पाटील यांनी वर्षभरापासून निधी वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. राज्यातील जिल्हा परिषदांमधील शिक्षण समिती सभापतींचे शिष्टमंडळ घेऊन मुयमंत्र्यांची या विषयावर भेट घेतली. त्यानंतर या प्रश्‍नाला वाचा फुटली. मुख्यमंत्र्यांनी रवी पाटील यांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त निधी शाळा खोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी द्यावा असे आदेश दिले.

सततच्या पाठपुराव्यामुळे चालू वर्षी शाळा खोल्या बांधकामासाठी ६ कोटी ५० लाख रूपये, दुरूस्तीसाठी २ कोटी रूपये निधी मंजुर करण्यात आला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter