Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मिरजेत झोपड्यांचे अतिक्रमण हटविताना झोपडीधारकांची अधिकार्‍यांबरोबर वादावादी

25-Jun-2019 : मिरज / प्रतिनिधी

दिंडी वेस , सुभाषनगर रोड येथे असणार्‍या झोपड्या हटविण्यासाठी गेलेल्या महापालिका अतिक्रमण पथकाबरोबर झोपडपट्टीधारक व महापालिका अधिकारी व कर्मचा र्‍यांबरोबर वादावादीचा प्रकार घडला. या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाने आपली कारवाई थांबविली तसेच झोपडपट्टी धारकांबरोबर बैठक घेवून पुढील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी सहा.उपायुक्त घोरपडे यांनी घेतला.

दोन दिवसांपूर्वी दिंडीवेस येथील काही झोपड्या हटविण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. त्यावेळी तेथील झोपडपट्टीवासियांनी त्याला विरोध केला होता. अतिक्रमणच्या अधिकार्‍यांनी तुम्हाला म्हाडा कॉलनीत घरकुले आहेत तेथे तुम्हाला जागा दिली जाईल, पुरावे आम्हाला दोन दिवसात द्या असे सांगितले होते. परंतु मंगळवारी पुन्हा पथक अतिक्रमण हटविण्यासाठी गेले. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण केलेल्या चार झोपड्या पाडल्यानंतर तेथील काही झोपडपट्टी धारकांनी परत गोंधळ घालायला सुरूवात केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter