Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अहिल्यानगरमध्ये दहशत माजविणारे दोन युवक जेरबंद

25-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

अहिल्यानगर ते माधवनगर मार्गावर पाण्याच्या टाकीजवळ हातात धारदार शस्त्र घेऊन फिरून तेथे दहशत माजविणार्‍या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसानी त्यांच्याकडून एक लोखंडी हत्यार जप्त केले.

संजयनगर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांना अहिल्यानगर ते माधवनगरकडे जाणार्‍या मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ दोघेजण हातात लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे सुमित हनुमंत सूर्यवंशी (वय १९, रा.अहिल्यानगर, गणपती मंदिराजवळ, सांगली) आणि दस्तगीर उर्फ परवेज इब्राहिम मुजावर (वय २१, रा.विजयनगर मराठी शाळेजवळ, सांगली) अशी सांगितली. त्या दोघांची अंगझडती घेतली असता सुमित याच्याजवळ एक धारदार लोखंडी हत्यार मिळाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter