Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भिडे गुरुजी आता पालखीमागून चालणार

25-Jun-2019 : पुणे / प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपुढे कोणाच्याही चालण्यावर आक्षेप घेणारे पत्रच पुणे पोलिसांना दिलं.

पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणीच या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रानंतर पुणे पोलिसांनी पालखीपुढे चालण्याची परवानगी नाकारली आहे. संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखीच्या मागून चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहणे आवश्यक असून तसा आपला प्रयत्न असल्याचं संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter