Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कडेगावात मराठा दाखल्यांसाठी अडवणूक - आ.विश्‍वजीत कदमांकडून विधानसभेत प्रश्‍न उपस्थित

29-Jun-2019 : कडेगाव / प्रतिनिधी

कडेगाव तहसिल कार्यालयातील विविध तसेच मराठा जातीच्या दाखल्यासाठी येथील अधिकारी विद्यार्थांची अडवणूक करीत असल्याची घटना घडत आहेत दाखल्यासाठी आमदार व वरीष्ठ अधिकार्‍यांना तहसील कायलर्यालयात फोन करावा लागत आहे , परंतु एजंटामार्फत एका तासात दाखला मिळत असल्याचे चित्र आहे. याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ . विश्‍वजीत कदम यांनी आयत्या वेळचा (औेचित्याचा) प्रश्र उपस्थित केला आहे.

कडेगाव तालुक्यातील ५५ गावांमधील हजारो विद्यार्थी आपल्या पुढच्या शैक्षणिक भवितव्यासाठी विविध प्रशासकीय दाखले मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत, मात्र कडेगाव महसूल प्रशासनातील दोन अधिकारी त्यांच्या शैक्षणिक जीवनाशी खेळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मराठा जातीचा दाखला हा प्रथम सेतू नायब तहसीलदार व नंतर तहसीलदार यांच्याकडे जातो परंतू मराठा दाखल्याची येथेच खरी अडवणूक होते . विशेष म्हणजे मराठा दाखल्यासाठीच अडवणूक केली जाते, तर दाखले लवकर मिळवून देण्यासाठी एजंट नेमले गेले आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter