Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
नेर्लेकर मुकबधीर विद्यालयातील शोषण प्रकरण... शाळेच्या खजिनदारासह सातजणांना अटक

29-Jun-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

इस्लामपूर येथील व्ही.एस. नेर्लेकर मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करून त्यांचे शोषण केल्याप्रकरणी शाळेच्या अधिक्षिका, खजीनदार (संस्थापकांचा मुलगा), शिक्षक व कर्मचारी अशा एकूण आठजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून सातजणांना अटक करण्यात आली आहे.

शाळेचा खजीनदार अभिमन्यु मोहनराव पाटील-रानमाळे (रा.अक्षर कॉलनी, इस्लामपूर), कर्मचारी जयवंत शामराव जाधव (रा.कैकाडी गल्ली, इस्लामपूर) व संजय रामचंद्र भांबुरे (रा.पेठ ता.वाळवा) या तिघांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधिशांनी १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. या प्रकरणातील विद्यालयाच्या हरी कुटे, बिझनेस कांबळे, सतिश कांबळे, संपतराव आवळे या चौघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.

इस्लामपूर येथील व्ही.एस.नेर्लेकर मुकबधीर विद्यालयात १०५ मुलांपैकी ७५ निवासी मुले आहेत. त्या मुलांना बेचव जेवण दिले जाते, तेही पोटभर मिळत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा पौष्टीक आहार दिला जात नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter