Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
माथाडी मंडळातील लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

29-Jun-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळातील लिपिक गुलाबराव शामराव पाटील यांना २ हजारांची मागणी करून चर्चेअंती १५०० रुपयांची मागणी केल्यावरून अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार यांचा व त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या कामगारांचा पगार काढण्याच्या मोबदल्यात काहीतरी खर्च करावा लागेल असे सांगून लाच मागण्याच्या उद्देशाने तक्रारदारास फोन करून भरण्यास बोलवित असल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती.त्यानुसार विभागाने पडताळणी केली असता पडताळणीत गुलाबराव पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

पाटील यांच्या विरुद्ध सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. गुलाबराव शामराव पाटील (वय ५२) यांच्या विरुद्ध विश्राम बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय कळंगुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, सारिका साळुंखे-पाटील, श्रीपती देशपांडे, अशोक तुराई, रविंद्र धुमाळ, राधिका माने, बाळासाहेब पवार यांनी केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter