Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
भटवाडी येथे दाम्पत्याची आत्महत्या

29-Jun-2019 : शिराळा / प्रतिनिधी

भटवाडी (ता.शिराळा) येथील नव विवाहित अविनाश बाळासो खबाले (वय २७) व पत्नी सोनाली अविनाश खबाले (वय २२) यांनी राहत्या घरी विष प्राशन केल्यानंतर गळफास लावून घेवून आत्महत्या केली.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी घडली. याबाबत भटवाडी येथील पोलीस पाटील शुभांगी निवास चव्हाण यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली.

याबाबत शिराळा पोलिसांतून समजलेली माहिती अशी की , अविनाश व सोनाली यांचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. तिचे माहेर विटा असून विवाह झाल्यापासून सहा महिने माहेरी जाणे बंद होते. मुलीचे वडील व अविनाश यांचा जनावरे विक्रीचा व्यवसाय होता.त्यातून सोनाली व अविनाश यांची ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले. सहा महिन्या ंपूर्वी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता.मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.पुढील तपास पोलीस नाईक दीपक हांडे करत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter