Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शिष्यवृत्ती वेळेत न दिल्यास कारवाई : दै.‘जनप्रवास’च्यावतीने सत्काराप्रसंगी ना.सुरेश खाडेंचा इशारा

29-Jun-2019 : सांगली /प्रतिनिधी

मागासवर्गीय, इतर मागासवर्गिय तसेच विद्यार्थ्यांना शासन देत असलेेल्या शिष्यवृत्तीची रक्कम शिष्यवृत्ती मंजूर होवूनही मिळत नसेल तर या संदर्भात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी दिला.

सांगली येथे दै. ‘जनप्रवास’ च्या मुख्य कार्यालयात राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याबद्दल ना. सुरेश खाडे यांचा सत्कार समुह संपादक संजय भोकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ना. खाडे बोलत होते.

ना. खाडे पुढे म्हणाले, जात पडताळणीसंदर्भातील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्राची प्रवेश घेताना गरज नाही, त्यांनी केवळ टोकण द्यायचे आहे. आणि त्यावरच त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल.

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडविल्याबद्दल ना. खाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपध्दतीचे कौतूक केले. पक्षाने मला खूप दिले आहे असे म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter