Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
केरेवाडी येथे भिंत अंगावर कोसळून एक ठार, एक जखमी

05-Jul-2019 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी

रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना महामार्गाच्या हद्दीत येणारे घर पाडत असता कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे घराची भिंत अंगावर पडून एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

किरण बाळासाहेब पाटील (वय २२ रा. केरेवाडी) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे तर विजय आबासाहेब पाटील (वय २२ , रा.केरेवाडी) हा तरूण गंभीर जखमी झाला असून जखमीवर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. या महामार्गामध्ये पाटील यांचे तालुक्यातील केरेवाडी येथील घर आलेले आहे. केरेवाडी गावानजिक एस.टी.स्टँड लगत हे घर े जे.सी.बी. मशीनच्या सहाय्याने पाडले जात होते. यावेळी जुन्या घरातील विटा व दगड आपणास भविष्यात उपयोगी पडतील या आशेने किरण पाटील व विजय पाटील हे दोघे भाऊ इमारत पाडत असताना त्या ठिकाणी थांबले होते.

किरण बाळासाहेब पाटील व विजय आबासाहेब पाटील यांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून किरण व विजय गंभीर झाले. दोघांनाही तातडीने मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असता किरण पाटील यांचा मृत्यू झाला.

किरणवर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले , तर विजय पाटील यांच्यावर मिरज येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter