Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सुमनताई निष्क्रीय आमदार, विकासाच्या मुद्यावर लढणार

05-Jul-2019 : तासगाव / प्रतिनिधी

तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात दुष्काळ पडलाय, त्यासाठी त्यांनी किती मोर्चे काढले, आंदोलने केली, लोकांच्या भेटी घेऊन त्यांना किती धीर दिला असा सवाल करत आमदार सुमनताई पाटील या निष्क्रिय आमदार असल्याची तोफ माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी डागत, या विधानसभेला आपण विकासाच्या मुद्यांवर भाजपकडून उमेदवार म्हणून उभं राहणार असल्याचे सांगितले. तासगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले साडेचार वर्षात तासगाव तालुक्यात आ. सुमनताई पाटील यांनी शून्य काम केले आहे. त्यांना विकासाची दिशा नाही. तासगाव तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी काय केलं. किती मोर्चे काढली , आंदोलने केली. याचा विचार आता तालुक्यातील जनतेने करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत खासदार संजयकाका व माझ्यात काही वैचारिक मतभेद होते , ते आता संपले असून आम्ही हातात हात घालून आता काम करणार आहोत. तासगाव हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला आहे , मात्र भाजपकडून तिकीट मिळाल्यासच आपण लढणार अन्यथा लढणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

भावनेचं राजकारण चालणार नाही : घोरपडे

स्व. आर. आर. आबा यांच्या निधनानंतर सर्वच पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. लोकांच्या सहानभूतीच्या लाटेवर आ. सुमनताई पाटील यांना मोठा विजय मिळाला , मात्र त्यानंतर साडेचार वर्षांत त्यांनी लोकांसाठी किती वेळ दिला. किती विकासकामे केली याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकांनी निवडून दिलय तर विकासकामे करा आता आर आर आबांच्या नावानं भावनेची लाट चालणार नाही असे अजितराव घोरपडे म्हणाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter