Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महापालिकेला आणखी १०० कोटी मिळण्यासाठी प्रयत्न करु : ना.खाडे

05-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

नगरसेवकांनी प्रभागतील दलित वस्ती सुधारण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, या प्रस्तावांना सामाजिक न्याय विभागाकडून तातडीने मान्यता दिली जाईल. मुख्यमंत्री मनपावर खूश आहेत. त्यामुळे आणखी शंभर कोटींचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांजवळ प्रयत्न करू, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

सामाजिक न्यायमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सुरेश खाडे व विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पृथ्वीराज देशमुख यांचा महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ना.सुरेश खाडे बोलत होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ.पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, दीपकबाबा शिंदे, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.

ना.सुरेश खाडे पुढे म्हणाले, जतसारख्या खडकाळ भागात पाणी नाही, तिथे कमळ फुलविले, आता जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात कमळ फुलले आहे. भाजपावर मतदारांनी विश्‍वास दाखविला, मी गरिबांचा आमदार असल्याने मला गरीबांच्या कल्याणासाठी असणारे खाते दिले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter