Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बोरगाव फाट्यानजीक अपघातात एक ठार, तिघेजण जखमी

23-Jul-2019 : कवठेमहांकाळ/ प्रतिनिधी

मिरज - पंढरपूर मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांव फाट्यानजीक ट्रक व तवेरा गाडी यामध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर तिघेजण गंभीर झाले. तवेरा गाडीचा चालक दत्तात्रय बाबूराव पाटील (रा.रेंदाळ जि.कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नांव आहे.

अपघाताबाबत माहिती अशी की, रेंदाळ येथील गावडे कुटूंबिय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलें होते. देवदर्शन आटोपून पंढरपूरहून रेदाळ गावी ते जात होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांव फाट्यानजीक अनुपमा हॉटेलजवळ शिरढोणहून मिरजेकडे जाणार्‍या तवेरा या वाहनाला (क्र. एम.एच.११/ए डब्ल्यू ७८६०) मिरजेहून सांगोल्याकडे जाणार्‍या ट्रकने (क्र. के ए.५६-१८६) जोरदार धडक दिली. या अपघातात तवेरा गाडीतील प्रवाशी अनिता नेताजी गावडे, नेताजी नमग्यानी गावडे व नक्षत्रा नेताजी गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter