25-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाने कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील दर्गेश्वर दूध संकलन केंद्रावर छापा टाकून तेथून भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारा विविध पदार्थांचा १ लाख ४७ हजार ३५६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला .
याबाबत अधिक माहिती अशी, अन्न व औषध प्रशासनाला कोकळे येथे असणार्या दुधकेंद्रात भेसळ होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तेथे छापा टाकला . घराच्या मागे असणार्या खोलीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, स्किम्ड मिल्क पावडर, लॅकटोज पावडर आणि कमानी किस्प रिफाईंड पाम कर्नेल तेल यांचा साठा व ३९६ ली.दूध असा १ लाख ४७ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
|