Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विनयभंगप्रकरणी बिसूरच्या वृध्दास सश्रम कारावास

25-Jul-2019 : सांगली प प्रतिनिधी

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बिसूर येथील मनोहर बाजीराव पाटील (वय ६६) या वृद्धास सह. प्रथमवर्ग न्यायदंडा धिकारी श्रीमती एस.पी. केस्तीकर-नलगे यांनी २ वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रु. दंड अशी शिक्षा सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की ,‘ मनोहर पाटील हे पिडित महिलेच्या घरासमोरील शाळूची पोती घेऊन जात असताना संबंधित महिलेने त्यांना शाळूची पोती नेण्यास अटकाव केला. त्यावेळी त्याने त्या महिलेला ही शाळूची पोती माझ्या जमिनीतील आहेत त्यामुळे मी ती घेऊन जाणार असे म्हणून त्या पिडित महिलेचा विनयभंग करून अश्‍लिल व लज्जास्पद भाषा वापरून झोंबाझोंबी करून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी ७ वा.च्या दरम्यान बिसूर येथे घडली होती. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी.ए.पाटील यांनी केला होता. सरकार पक्षातर्फे ए.एस.पटेल यांनी काम पाहिले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter