Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
महापालिकेच्या उपायुक्तपदी राजेंद्र तेली

25-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या उपायुक्तपदी जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी ते पदभार स्विकारणार आहेत. तेली यांनी सांगलीतून १९९१ साली आकाश वाणीतून आपल्या कामाला सुरूवात केली आहे. मे २०२० मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.

महापालिकेच्या उपायुक्त मौसमी बर्डे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर तेली यांची नेमणूक केली आहे. तेली हे मूळचे गडहिंग्लज येथील आहेत. त्यांनी यापूर्वी गडहिंग्लज, मलकापूर (कराड), बार्शी, सांगोला या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते जयसिंगपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. शासनाकडून नुकतीच राजेंद्र तेली यांची सांगली महापालिकेकडे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter