Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दगडफेक केल्याचा तिघांविरुध्द गुन्हा

25-Jul-2019 : सांगली प प्रतिनिधी

काहीही कारण नसताना २४ जुलै रोजी मध्यरात्री ३ वा.च्या सुमारास घरावर दगडफेक करून मला व माझ्या काकांना शिवीगाळ करून आमच्या नादाला लागू नकोस, ठेवत नाही असे म्हणून दमदाटी केल्याची फिर्याद आयाज अमीरखान पठाण (वय ३९, रा.बाजार पेठ, बुधगाव) यांनी तिघांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसानी तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , पठाण यांचे हॉटेल सेलेब्रेशनच्या बाहेर पानपट्टीचे दुकान आहे.२३ जुलै रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी तिघेजण आले होते. पठाण हे पानपट्टी बंद करून जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter