Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अडथळा करणारे पोल व सिग्नल हटवा

25-Jul-2019 : सांगली प प्रतिनिधी

येथील सिव्हिल चौक रूंदीकरणामध्ये अडथळा ठरणारे विद्युत पोल व वाहतूक सिग्नल तातडीने काढून रस्ता रूंदीकरण करावे, असे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी अधिकार्‍यांना दिले. त्यामुळे सिव्हिल चौकातील वाहतुकीची कोंडी आता सुटणार आहे.

येथील सिव्हिल चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम व मनपाच्या अधिकार्‍यांनी गुरूवारी सिव्हिल चौकाची पाहणी केली. सिव्हील चौकात रस्त्याला अडथळा ठरणारे वाहतुक सिग्नल हटविण्याचे आदेश आयुक्त कापडणीस यांनी विद्युत विभागाला दिले , तर विद्युत पोल देखील रस्त्यावर आहेत. याबाबत वीज वितरण महामंडळाशी चर्चा करून तत्काळ हा प्रश्‍न निकाली काढावा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या.

तसेच सिव्हील चौकात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे रस्ते देखील खराब झाले आहेत. या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अंडरग्राउंड गटार करून साचणारे पाणी सिव्हिलच्या बाजुच्या भुयारी गटारीला जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी शहर अभियंता पाटील यांना दिले. हा चौक तत्काळ रूंदीकरण करणे आवश्यक आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter