Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
डोंगरवाडी येथे शॉक लागून शेतकर्‍याचा मृत्यू

29-Jul-2019 : सलगरे / प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथील सोपान पवार या शेतकर्‍याचा विजेच्या पोल जवळील कडुलिंबाचे डहाळे काढत असताना वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहीती अशी की, सोपान तुकाराम पवार (वय ५९, वर्षे रा.डोंगरवाडी ता.मिरज) हे शेतकरी असून सोमवारी सकाळी आपल्या शेळ्या व मेंढ्यांसाठी वैरण व कडुलिंबाचे डहाळे आणण्यासाठी डोंगरवाडी - शिपुर दरम्यान शेतातील घरातून सायकलने सकाळच्या वेळी बाहेर पडले. मात्र बराच उशीर झाला तरी वडील घरी न परतल्याने शोधाशोध केल्यानंतर सोपान पवार यांचा मुलगा सिध्दु यांना रस्त्याच्या बाजुस असणारी वडीलांची सायकल दिसली, यानंतर नजीकच कडुलिंबाच्या झाडाजवळ विद्युत पोल जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter