29-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह शिराळा, वाळवा तालुक्यात सोमवारी पावसाची संततधार सुरुच राहिली. धरण क्षेत्रातील पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काखे-मांगले, आरळा-सित्तूर या दोन पुलांसह चार बंधारे पाण्याखाली गेले, मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी पाच फुटांनी घटली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी सायंकाळी १७ फूट होती. पश्चिम भागातील पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु राहिली. पूर्व भागातील अनेक गावात पावसाच्या सरी बरसल्या. सांगली, मिरज शहरातही दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.
चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. येथे चोवीस तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरातही ४० मिलीमीटर पाऊस झाला.
|