29-Jul-2019 : केरळ येथे दोन कोटींचा दरोडा टाकणारी विट्यातील टोळी गजाआड
विटा / प्रतिनिधी
खंबाळे (ता.खानापूर) येथील सुरेशशेठ सुर्वे यांच्या केरळ राज्यातील (पतनमतठ्ठा) येथील कृष्णा ज्वेलर्सवर दरोडा टाकून ५ किलो सोने आणि १३ लाख रुपयांची रोकड असा एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास करणार्या विटा येथील टोळीला पोलिसांनी केरळमध्ये अवघ्या काही तासात जेरबंद केले आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी केरळ येथे घडली. या दरोड्यातील सर्व संशयित खानापूर तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. नितीन जाधव, प्रशांत जाधव (दोघे रा.कार्वे ता.खानापूर), दादासाहेब गायकवाड, गणेश जाधव (दोघे रा.विटा), आकाश खरात (रा.शेळकबाव ता.कडेगाव सध्या रा.मंगरुळ ता.खानापूर) अशी या अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
|