29-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून डोक्यावर दांडक्याने वर्मी घाव करून खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथील बाबुराव जगदाळे यांचा खून केल्या प्रकरणी सोमवारी एकास तीन वर्षे सक्त मजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातवळेकर यांनी सुनावली. पिराजी महादेव जगदाळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना ही दिनांक १७- ८-२०१४ रोजी भेंडवडे येथे घडली होती.
|