Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वेळेत घरपट्टी भरणार्‍यांना महापालिकेतर्फे विशेष सवलत

30-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या घरपट्टीधारकांना २०१९-२० या वर्षातील बिलांचे वाटप करण्याचे काम सुरू असून दि. ३० सप्टेंबरपर्यंत एकरकमी घरपट्टी भरल्यास सामान्य करात दहा टक्के तर ३० ऑक्टोबरपर्यंत एकरकमी घरपट्टी भरल्यास पाच टक्के सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी केली.

मनपा क्षेत्रात चालू घरपट्टी व थकित घरपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई घरपट्टी विभागाकडून केली जात आहे. आता वेळेत घरपट्टी भरणार्‍यांसाठी घरपट्टी विभागाने विशेष सवलत योजना लागू केली आहे. मनपा क्षेत्रातील घरपट्टीधारकांना २०१९-२० या आर्थिक वर्षातील घरपट्टीची मागणी बिले वाटप केली जात आहेत. मालमत्ताधारकांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घरपट्टीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास मालमत्ता धारकांच्या बिलातील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाणार आहे, तर दि. २० ऑक्टोबरपर्यंत एकरकमी घरपट्टी भरल्यास सामान्य करात पाच टक्के सवलत दिली जाणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter