Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सत्यजीत, सदाभाऊंची कॉंग्रेसच्या मुलाखतीकडे पाठ

02-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छूक असणार्‍यांच्या मुलाखती शुक्रवारी घेण्यात आल्या, मात्र या मुलाखतीला शिराळा विधानसभेचे उमेदवार सत्यजीत देशमुख व खानापूर-आटपाडी विधानसभेचे उमेदवार सदाशिव पाटील यांनी पाठ फिरविली होती. प्रदेशच्या दोन वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी पक्षाची उमेदवारी नाकारल्याची चर्चा कॉंग्रेस कमिटीमध्ये सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आ.विश्‍वजीत कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी साध्या पध्दतीने मुलाखती दिल्या. अनेकांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करा, पण प्रामाणिक काम व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली.

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतून इच्छूक असणार्‍यांचे अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी कॉंग्रेस कमिटीमध्ये पार पडल्या.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter