Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्‍न दुर्लक्षीत ः राजीव खांडेकर

02-Aug-2019 : इस्लामपूर /प्रतिनिधी

जागतिकीकरणामुळे झपाट्याने बदल झाले , परंतू सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्‍न आहेत तेथेच आहेत. जागतिकीकरण ज्या पद्धतीने फायदेशीर ठरेल असे वाटले होते, तसे झालेले नाही. शेतकरी आणि शेवटच्या माणसासाठी जेव्हा या जागतिकीकरणाचा वापर होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने जागतिकीकरण फायद्याचे ठरेल. असे प्रतिपादन ‘एबीपी माझा’ चे संपादक राजीव खांडेकर यांनी केले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त नगर पालिकेच्या वतीने आयोजित नगर व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष दादासो पाटील, प्रा.शामराव पाटील, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, दीपक झिंजाड, शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter