Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ब्लॅकमेल करुन भाजपकडून ‘मेगा भरती’

02-Aug-2019 : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

सांगली / प्रतिनिधी

आयकर, सीबीआय व ईडीची भिती उद्योगपतींना दाखवून पूर्वी कर गोळा केला जात होता , मात्र आता राजकारणात ‘टॅक्स टेरेरिझम’ सुरू असून भाजपने दहशत व ब्लॅकमेलिंग करून राजकीय महाभरती सुरू केली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजपच्या सरकारला थोपविणे आवश्यक आहे, अन्यथा स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती निर्माण होईल, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्‍वजीत कदम यांचा जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आ. कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आ.जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ.मोहनराव कदम, माजी आ. पी.एन.पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अलका राठोड, प्रकाश सातपुते, सत्यजीत देशमुख, शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर आदी उपस्थित होते.

कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस नेतृत्वहिन झाली की काय? असा प्रश्‍न पडला होता. मात्र विश्‍वजीत कदमांच्या निवडीने कॉंग्रेसला पुन्हा उभारी येईल, असा विश्‍वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात वातावरण होते, तरी देखील कॉंग्रेसचा पराभव झाला. भाजपने लोकसभेची निवडणूक वेगळ्या रणनितीने जिंकली. राष्ट्रीय सुरक्षा, काश्मिर, पाकिस्तानचा मुद्दा यावर निर्लज्जपणे धार्मिक ध्रुवीकरण केले. महात्मा गांधींना मारणार्‍या नथुराम गोडसेला देशभक्त बनविले. ‘ईव्हीएम’ चा मुद्दा तर आहेच. ईव्हीएम मशिन आम्ही तपासणीसाठी मागत आहोत , परंतू निवडणूक आयोग मशिन आम्हाला देत नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter