Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पत्रकार संरक्षण कायद्याचा पाठपुरावा करणार : ना.चंद्रकांतदादा

03-Aug-2019 : पत्रकार संरक्षण कायद्याचा पाठपुरावा करणार : ना.चंद्रकांतदादा

कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्यातील गाव, तालुका पातळीवरील सर्वच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन बांधिल आहे अशी ग्वाही महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात दिली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सकाळी १० वाजता ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दसरा चौकातील एम्पायर टॉवर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एबीपी माझा’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर होते, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी केले.

उद्घाटनपर भाषणात ना. चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की, समाज आणि प्रशासन यांच्यात पत्रकार हा महत्वाचा दुवा आहे. पत्रकार संरक्षण कायदा हा केंद्राकडे आहे, परंतु तो मार्गी लावू, कोल्हापूर तसेच सांगलीतील पत्रकार भवनचे काम तातडीने पूर्णत्वास नेऊ .

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter