03-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी
सांगलीच्या वखारभाग येथील चेंबर ऑफ कॉमर्स समोरील एका जुन्या धोकादायक इमारतीचा काही भाग शनिवारी कोसळला. सुदैवाने या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्याने जिवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन यंत्रणेने तत्काळ धाव घेतली. आयुक्तांच्या आदेशाननंतर ही धोकादायक इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.
वखारभाग येथील मुख्य मार्गावर १९५० पासून शेटे यांच्या मालकीची इमारत आहे. ही डोंबे इमारत म्हणून ओळखली जाते.
|