Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍यास सक्तमजुरी

16-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुध्द तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याच्या गुन्हा सिध्द झाल्यामुळे आरोपी अमर उर्फ अंबरीष दिलीप घाडगे (वय २३ रा. हातीद ता. सांगोला, जि. सोलापूर ) यास जिल्हा न्यायाधिशांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.

खटल्याची हकीकत अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे राहण्यास होती. त्यांच्या घराशेजारील एकाने मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकर्‍याच्या शेतात बेदाणा शेड घातलेले होते. या शेडवर पिडीत मुलगी चुलतीसमवेत कामास जात होती. तेथे तिची ओळख द्राक्ष वाहतुक करणार्‍या चालक आरोपी अमर घाडगे याच्याशी झाली. त्याने मुलीस विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखविले. आणि तीला पळवून सांगलीतील इंदिरानगर येथे आणले. व दोन महिने तेथेच ठेवले. ही घटना ७ एप्रिल २०१६ रोजी घडली. या कालावधीत त्याने मुलीच्या इच्छेविरुध्द शरीरसंबंध ठेवले. दरम्यान पिडीत मुलीच्या वडिलांनी अज्ञात इसमाने मुलीस पळवून नेल्याची फिर्याद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter